शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रामदास आठवलेंनी घेतली सुशांतच्या वडिलांची भेट, रियाबद्दल व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:42 IST

दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर  भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे

ठळक मुद्देदिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर  भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे

चंढीगड - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुशांतच्या मृत्युचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने तिच्यावर केलेल्या आरोपांवरील चुप्पी नुकतीच तोडली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सुशांतबद्दलच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली. सुशांतबद्दल लाखो चाहत्यांना सहानुभूती असून केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सुशांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 

दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर  भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचा फोटो आठवले यांनी शेअर केला आहे. सुशांत प्रकरणात राज्यातील भाजपा नेत्यांनीच सीबीआयच्या चौकशीची मागणी करत हे प्रकरण उचलून धरले आहे. त्यानंतर, राणे कुटुंबीयांनीही या प्रकरणाल लक्ष घातले. आता, मोदी सरकारमधील मंत्री असलेले रामदास आठवले यांनी सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्युनंतर सुशांतच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेणार रामदास आठवले एकमेव केंद्रीयमंत्री आहेत.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्तीचा हात असण्याची शक्यता आहे. हत्या असेल किंवा आत्महत्या, पण या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी. सुशांतची हत्या झाली असेल हे मी यापूर्वीच सांगितले होते. तसेच, याप्रकरणाची सीबीआय मागणीही आम्ही केली होती. आता, सीबीआय याप्रकरणाचा तपास करत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आम्ही आहोत, संपूर्ण देश आहे, असेही आठवले यांनी म्हटले.  

रिया अन् अंकिता यांचा वाद

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबासोबत त्याचे मित्र आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल बरेच दावे केले. तिने केलेल्या दावे अंकिता लोखंडे हिने फेटाळून लावले आहेत. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर पोस्टवर लिहिले की, रिलेशनशीपला सुरूवात झाल्यापासून 23 फेब्रुवारी, 2016 पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नव्हते. सुशांत पूर्णपणे बरा होता.

रियाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन ?

सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्डच्या एंट्रीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. न्यूज 18 इंडियाला दिलेल्या मुलाखतीत छोटा डॉन शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

छोटा शकीलने याप्रकरणी गौरव आर्याशी ओळख असण्यासही नकार दिला आहे. छोटा शकीलच्या मते त्याने हे नाव पहिल्यांदा ऐकले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, ही सर्व कहाणी रचण्यात आली आहे की गौरवचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. आमचे गौरवशी काही घेणेदेणे नाही आहे. आम्ही रिया चक्रवर्तीला देखील ओळखत नाही. आमचे तिच्याशी काही कनेक्शन नाही.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSushant Singhसुशांत सिंगSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत