शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:52 IST

Ramvilas Paswan News : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले.

ठळक मुद्देरामविलास पासवान यांचा जन्म ५ जुलै १९४६ रोजी बिहारमधील खगरियामध्ये झाला होता पासवान यांनी बिहार आणि देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख जपली होतीपासवान यांनी गेल्या ३२ वर्षांत ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ९ निवडणुकांत ते विजयी झाले

नवी  दिल्ली -  लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकारमध्ये ते ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सांभाळत होते. 

 

रामविलास पासवान यांचा जन्म ५ जुलै १९४६ रोजी बिहारमधील खगरियामध्ये झाला होता. पासवान यांनी कोसी कॉलेज आणि पाटणा विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांची डीएसपी म्हणून निवड झाली होती. मात्र त्याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत पासवान यांनी बिहार आणि देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख जपली होती.

पासवान यांनी गेल्या ३२ वर्षांत ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ९ निवडणुकांत ते विजयी झाले होते. सध्याच्या मोदी सरकारमध्ये रामविलास पासवान ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार पाहत होते. दरम्यान, देशातील सहा पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा विक्रम पासवान यांच्या नावावर आहे. तसेच पासवान यांनी केंद्रात रेल्वे, माहिती प्रसारण, खनिज, रसायन, अन्न आणि नागरी पुरवठा अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहार