शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी होम क्वारंटाईन, पॉझिटीव्ह आमदाराच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 12:08 IST

बालासोर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा नेते सुकांता कुमार नायक यांच्यासमेवत मतदारसंघात दौरा केला होता

ठळक मुद्दे बालासोर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा नेते सुकांता कुमार नायक यांच्यासमेवत मतदारसंघात दौरा केला होतानायर यांचा सोमवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री आणि बालासोरचे खासदार यांनी दिल्लीस्थित घरी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ओडिशातील भाजपा आमदारासोबत गेल्या आठवड्यात दोनवेळा सारंगी यांनी बैठक घेतली होती. या भाजपा आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सांरगी हे क्वारंटाईन झाले असून त्यांनी स्वत: ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. 

बालासोर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा नेते सुकांता कुमार नायक यांच्यासमेवत मतदारसंघात दौरा केला होता. त्यावेळी, 2 आणि 3 जुलै रोजीच्या दोन दिवसातील कार्यक्रमात नायक यांच्याशी जवळून संबंध आला. मला मिळालेल्या माहितीनुसार आमदार सुकांता नायक यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे मी दिल्लीतील घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेत असल्याचं सारंगी यांनी म्हटलंय.  नायर यांचा सोमवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. ओडिशात कोरोनाची लागण होणारे नायक हे पहिले आमदार आहेत. बालासोरचे उप-जिल्हाधिकारी हरीश्चंद्र जेना यांनी याबाबत माहिती दिली असून नायक यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले. तसेच, नायक यांच्या संपर्कातील लोकांशी संपर्क साधून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचेही जेना यांनी सांगितले. 

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिदने आपल्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले होतं. त्यावेळी, मोदी सरकारमधील मंत्री प्रताप सारंगी यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी शाहिद आफ्रिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी असा सल्ला दिला होता. पाकिस्तानमधील प्रत्येक एका हॉस्पिटलची मला पूर्ण माहिती आहे. शाहिद आफ्रिदीला जर कोरोनातून वाचायचं असेल तर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी, असे सारंगी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले होते. 

टॅग्स :ministerमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाOdishaओदिशाdelhiदिल्ली