शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:25 IST

जनता दरबार संपल्यानंतर तिथून निघत असताना गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बिहारमधील बेगूसराय येथे त्यांच्या मतदारसंघात आले असता त्यांच्यावर एका युवकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते. जनता दरबारातून बाहेर पडत असताना एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना वाचवले. पोलीस हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. हल्ला होताच गिरीराज सिंह म्हणाले की, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव दाढी असलेल्यांच्या बाजूने उभे राहतील, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जनता दरबार संपल्यानंतर स्थानिक नगरसेवक आणि आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता शाहजादुज्जमा उर्फ ​​सैफी याने काही प्रश्न विचारले होते. मग तिथून निघताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यानंतर सैफीने घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिल्याने त्यांनी गिरीराज सिंह यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

गिरिराज सिंह पुढे म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणारा दाढीवाला असल्याने आता तेजस्वी यादवही त्याच्या बाजूने उभे राहतील हे दुर्दैवी आहे. अखिलेश यादवही त्यांच्या मतांसाठी हल्लेखोराच्याच बाजूने उभे राहणार आहेत. पण, आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. जो कोणी जातीय सलोखा बिघडवू इच्छित असेल त्याविरोधात माझा आवाज उठवत राहील.

गिरिराज सिंह अशा लोकांना घाबरत नाहीत. वक्फ बोर्ड जमीन बळकावण्याची मोहीम राबवत आहे. त्यांना जी काही जमीन ताब्यात घ्यायची असते ती घेतली जाते. बेगूसरायसह संपूर्ण देशात हा प्रकार सुरू आहे. हिंदूंनी देशात कधीही दंगल केली नाही. पण रामनवमीपासून ते हिंदूंच्या अशा सर्वच धार्मिक यात्रेपर्यंत हल्ले होत असतात. राहुल गांधी, तेजस्वी आणि अखिलेश यादव हे मतांचे व्यापारी आहेत आणि अशा हल्लेखोरांना वाचवण्यासाठी ते नेहमीच पुढे येतात, असेही गिरिराज सिंह यांनी नमूद केले. 

टॅग्स :Biharबिहारministerमंत्री