शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! केंद्रीय मंत्र्याचा भाऊ दीड तास रुग्णालयात तडफडत राहिला; उपचार न मिळाल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:04 IST

Ashwini Choubey : निर्मल चौबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे (Ashwini Choubey) यांचे धाकटे भाऊ निर्मल यांचे बिहारमधील भागलपूर येथील मायागंज रुग्णालयात निधन झाले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत मोठा गोंधळ केला. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. निर्मल चौबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि मृतदेह घेऊन घरी गेले.

केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचे धाकटे बंधू निर्मल चौबे यांचे मायागंज रुग्णालयात निधन झाले. याप्रकरणी आयसीयूमध्ये कर्तव्यावर असलेल्या दोन डॉक्टरांना गैरहजर राहिल्याचा आरोप ठेवून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निर्मल यांचा मुलगा नितेश चौबे यांनी सांगितले की, घरी दुपारी चार वाजता वडिलांना छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी चौबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना आयसीयूमध्ये हलवले.

एकही डॉक्टर पोहोचला नाही

नितेशच्या म्हणण्यानुसार, जेव्हा वडिलांना दाखल करण्यात आले तेव्हा तेथे डॉक्टर नव्हते, तर त्यांची प्रकृती सतत खालावत होती. बीपी मशीन म्हणजे काय हे अटेंडंटलाही माहीत नव्हते. यादरम्यान वडिलांची प्रकृती ढासळत राहिली, मात्र उपचारासाठी एकही डॉक्टर पोहोचला नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या गोंधळादरम्यान डॉ. महेश कुमार आणि डॉ. असीम कुमार दास यांना रोषाला सामोरे जावे लागले. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि लेखी तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कर्तव्यावर गैरहजर असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित केले. 

निर्मल चौबे दीड तास तडफडत राहिले, उपचार न मिळाल्याने मृत्यू 

कुटुंबीयांचे म्हणणे आहे दीड तास उपचार झाले नाहीत. नातेवाईक आणि युवा मोर्चाच्या नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. रुग्णालयाचे अधीक्षक आयसीयूमध्ये पोहोचले, तेथे नातेवाईकांनी त्यांना घेराव घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या डीएसपींनी कुटुंबीयांना लेखी तक्रार केल्यास चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर लोक शांत झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर