शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अरेरे! बेरोजगार तरुणाच्या खात्यात अचानक आले 18 लाख, सत्य समजताच हादरला, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:59 IST

तरुणाने थेट जवळच्या एटीएममध्ये जाऊन त्याचा बँक बॅलेन्स तपासला. तेव्हा एक-दोन नव्हे तर एकूण 18 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते.

कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या हनुमानगडमध्ये राहणारा एक तरुण मोबाईलचा वापर करत होता. याच दरम्यान, अचानक त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेज वाचून तो आनंदाने उड्या मारू. तरुणाने थेट जवळच्या एटीएममध्ये जाऊन त्याचा बँक बॅलेन्स तपासला. तेव्हा एक-दोन नव्हे तर एकूण 18 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. यानंतर तो तरूण पैसे खर्च करू लागले. 

सुरुवातीला पैसे आल्य़ावर तरुणाचा विश्वास बसला नाही, पण त्याने लगेच जवळच्या एटीएममध्ये जाऊन बॅलेन्स तपासला. तरुणाने सर्व पैसे खर्च केले. यानंतर एक दिवस बँकेतून फोन करून तरुणाला बोलावण्यात आलं. चुकून तरुणाच्या खात्यात 18 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. हे प्रकरण वाढल्यावर बँक अधिकाऱ्यांनीही तरुणाची चौकशी  सुरू केली. सोबतच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. बाधितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. हीच रक्कम पीडित कुटुंबीयांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार होती, परंतु बँकेच्या थोड्याशा चुकीमुळे ही रक्कम हनुमानगड जिल्ह्यातील टिब्बी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दिनेश नावाच्या व्यक्तीच्या खात्यात गेली. निधी हस्तांतरित करताना, खात्याचा एक नंबर चुकला. त्यामुळे एवढी मोठी घटना घडली.

दिनेशनेही कोणतीही माहिती बँकेला न देता हे पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. दिनेशने काही रक्कम वडिलांच्या उपचारावर खर्च केली तर काही इतर वस्तूंवर खर्च केली. त्याने खात्यातून जवळपास सर्व पैसे काढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण वाढल्यावर कुटुंबाने जोधपूर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला. जोधपूर जिल्हा प्रशासनाने दिनेशला जाब विचारला असता त्याने पैसे परत करेन असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.