शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

Lockdown: लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला, गावी गेला; आपल्यासारख्याच 70 लोकांना रोजगार दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 13:00 IST

Unemployed in lockdown, success story of Man of Odisha: गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनची (first Lockdown) घोषणा झाली तेव्हा लाखोंच्या संख्येने लोक आपल्या गावी परतले. अनेकजण बेरोजगार झाले, लॉकडाऊन संपताच पुन्हा शहरांकडे वळले. मात्र, यामध्ये एक व्यक्ती असा होता ज्याने इतिहास रचला.

Corona Virus Lockdown: गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनची (first Lockdown) घोषणा झाली तेव्हा लाखोंच्या संख्येने लोक आपल्या गावी परतले. अनेकजण बेरोजगार झाले, लॉकडाऊन संपताच पुन्हा शहरांकडे वळले. मात्र, यामध्ये एक व्यक्ती असा होता ज्याने इतिहास रचला. तो बेरोजगार झाला म्हणून गावी जरूर आला, परंतू आपल्यासोबत 70 लोकांना रोजगार दिला. (Unemployed in lockdown; Man went village and gave jobs for 70 people in Odisha.)

रंजन साहू हे (40 वर्ष) पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी निघून आले. ते कोलकातामध्ये सात वर्षांपासून एका कापड उद्योग करणाऱ्या कंपनीत काम करत होते. ही कंपनी लॉकडाऊनमुळे बंद पडली आणि त्या कंपनीतील सर्व कर्मचारी बेरोगार झाले. साहू हे यामुळे केंद्रपाडा येथील गुंथी गावात परतले. त्यांनी कपड्याच्या शिलाईचे काम सुरु केले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कंपनीतील अनुभव वापरून आपल्यासोबत ७० तरुणांना या कामाला लावले, जे आपली नोकरी गमावून बसले होते. 

साहू सांगतात, घरी परतल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार नव्हता. कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी काही मोजकेच पैसे शिल्लक होते. मात्र, अनेकांकडे ते देखील नव्हते. हे सर्वजण कोणते ना कोणते काम मिळते का हे पाहत होते. माझ्या गावात अनेकजण केरळ आणि सूरतहून परतले होते. यांनी कापड उद्योगात काम केले होते. यामुळे मी विचार केला की या लोकांना घेऊन मी कापड उद्योग सुरु करू शकतो. 

भुवनेश्वरपासून 110 किमी दूरवर असलेल्या गावात साहूने कापड उद्योग सुरु केला. याचे नाव ठेवले रॉयल ग्रीन गारमेंट कंपनी. 45 शिलाई मशिने गोळा केली आणि 3000 स्क्वे. फूटांच्या एका मोठ्या छपराखाली कंपनी उभी केली. साहू यांनी 18 वर्षांपूर्वी ओडिसा सोडले होते. त्यांनी दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, सूरत आणि नेपाळमध्ये कापड उद्योगांमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला होता. या कंपन्यांमध्ये त्यांनी सर्व कामे केली होती, परंतू आपली कंपनी उभी होईल असा विचारही केला नव्हता. आता हा व्यवसाय ते वाढविण्याचा विचार करत आहेत.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी