शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीसाठी कपडे उतरवले, विद्यार्थिनीने पेटवून घेतले; अपमान सहन न झाल्याने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 08:20 IST

कॉपी करत असल्याच्या संशयावरून शिक्षिकेने नववीच्या एका विद्यार्थिनीचे कपडे काढून झडती घेतली.

जमशेदपूर: कॉपी करत असल्याच्या संशयावरून शिक्षिकेने नववीच्या एका विद्यार्थिनीचे कपडे काढून झडती घेतली. विद्यार्थिनी हा अपमान सहन करू शकली नाही व घरी येताच तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली विद्यार्थिनी घरातून रस्त्यावर आली आणि बेशुद्ध होऊन  कोसळली. लोकांनी पाणी टाकून आग विझवली व नंतर तिला रुग्णालयात नेले. जमशेदपूरच्या छायानगर भागात ही हृदयद्रावक घटना घडली. 

जवळपास ९५ टक्के भाजल्याने तिला टाटा मेन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. आई, भाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षिका चंद्रा दास यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. मी विद्यार्थिनीला मारहाण केली नाही तसेच तिचे कपडेही  काढले नाहीत. कॉपी करताना पकडल्यानंतर तिने कपड्यात कॉपी लपविल्याचे अन्य विद्यार्थिनींनी सांगितले हाेते. (वृत्तसंस्था) 

मुलीने केलेले आरोप

दुपारी चार वाजता पर्यवेक्षिका चंद्रा दास यांनी मला कॉपी करताना पकडले. त्यांनी मला सर्वांसमोर चापट मारली व सर्वांसमोर मला कपडे काढायला सांगितले. मी विरोध केला तेव्हा जास्त हुशार  झाली का, असे म्हणत माझे कपडे काढले, असे पीडित विद्यार्थिनीने सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :jamshedpur-pcजमशेदपूर