शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाबद्दल अनिश्चितता कायम, केंद्राच्या कार्यपद्धतीबद्दल अण्णासमर्थकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:24 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम

विश्वास खोड  नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. अण्णांशी बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिल्लीत आहेत. मंगळवारी सकाळी महाजन यांच्या स्वीय सहायकांनी अण्णांना भेटून केंद्र सरकारच्या आश्वासनांचा मसुदा वाचून दाखविला. अण्णांनी त्यात सुधारणा सुचविल्या असून, या सूचना तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. उद्या सकाळपर्यंत सरकारी अधिकारीही येतील, असे अण्णा हजारे यांनी आज सांगितले. अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेमुळे काहीतरी ठोस तोडगा निघेल, अशी आशा आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला अण्णांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. त्यामुळे केंद्र सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीबद्दल आंदोलकाच्या संयोजकांनी नाराजी व्यक्त केली.अण्णांचे वजन पाच किलोने घटले आहे. तरीही अण्णांनी सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि चिंतेचे काही कारण नाही, अशा शब्दांत आंदोलकांचा हुरूप वाढविला. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी बारा राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले आंदोलन सरकारविरोधात नाही, तर सरकारने त्यांचे कर्तव्य करावे, यासाठी आहे, असे अण्णांनी नमूद केले.अण्णांची विश्वंभर चौधरी यांची भेट घेतली. त्यानंतर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे केंद्र सरकारने अवमूल्यन केले, असा आरोप चौधरी यांनी केला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी किमान केंद्रीय मंत्री सरकारने पाठविणे आवश्यक आहे, असेही चौधरी म्हणाले. काँग्रेस सरकारने २०११ मधील आंदोलन अत्यंत संवेदनशीलतेने हाताळल्याचेही त्यांनी नमूद केले.१४ जणांची प्रकृती बिघडलीबलराम आणि महेंद्र प्रताप या आंदोलकांना प्रकृती बिघडताच, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारीही तिघांची प्रकृती बिघडली होती. आंदोलन काळात १४ जणांची प्रकृती बिघडली, पण हे सर्वजण रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झालेत. उन्हामध्ये प्रकृतीची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन अण्णांनी आंदोलकांना केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे