उमरेड
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार
उमरेड
चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचारसायकी येथील घटना : आरोपीचा शोध सुरूउमरेड : चाकूचा धाक दाखवून ६५ वर्षीय वृद्धाने तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायकी येथे घडली. या प्रकरणातील आरोपीचा उमरेड पोलीस शोध घेत आहेत.रामभाऊ संपत थोटे (६५, रा. सायकी, ता. उमरेड) असे आरोपीचे नाव आहे. सायकी येथील बंडू शिरभाते यांचे सायकी शिवारात शेत असून, शेतात घर आहे. पीडित तरुणी ही शेतातील घरी तिच्या आई व भावासोबत राहते. ते शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, सदर तरुणी ही घरी एकटीच असल्याचे पाहून आरोपी रामभाऊने तिच्या घरात प्रवेश केला आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला. रामभाऊ हादेखील शिरभातेकडे नोकरी करतो. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असून, शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी भादंवि ३७६ ,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मृणालिनी वंजारी व सहकारी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)***