शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे, मोदींचे आमंत्रण स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 16:11 IST

boris johnson : गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत.

ठळक मुद्दे यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे प्रमुख जॉन मेजर 26 जानेवारी रोजी मुख्य अतिथी म्हणून परेडमध्ये सामील झाले होते.

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ही माहिती दिली आहे. भारत दौर्‍यावर आलेल्या ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जॉन्सन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतात येतील. दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते.

गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1993 मध्ये ब्रिटनचे प्रमुख जॉन मेजर 26 जानेवारी रोजी मुख्य अतिथी म्हणून परेडमध्ये सामील झाले होते. रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 नोव्हेंबरला फोनवरून बोरिस जॉन्सन यांना औपचारिकरित्या आमंत्रित केले होते. यानंतर कथितरित्या पंतप्रधानांना जी -7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, ज्याचे आयोजन पुढील वर्षी ब्रिटेनमध्ये होणार आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानांचा हा प्रस्तावित दौरा ब्रक्झिटच्या पार्श्वभूमीवर असे मानले जात आहे की, ब्रिटन भारतासारख्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांशी व्यापार संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्यापार कराराशिवाय युरोपियन संघातून बाहेर पडल्यास ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जुलैमध्ये पाच प्रमुख क्षेत्रांना सहमती यावर्षी जुलैमध्ये दोन्ही देशांनी लाइफ सायन्स, इन्फॉरमेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी), फूड अँड बेव्हरेज, केमिकल्स आणि सर्व्हिसेस या पाच प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्यास सहमती दर्शविली. मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. या दरम्यान, जयशंकर यांनी व्यापार, संरक्षण, शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी डोमिनिक राब यांच्याशी चर्चा केली. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनNarendra Modiनरेंद्र मोदी