शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 12:09 IST

व्हीआयपी परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना UFO सदृश वस्तू दिसली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानाच्या वरती काही दिवसांपूर्वी UFO (अनआयडेन्टिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) घिरट्या घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या २ किमी क्षेत्र हे 'नो फ्लाय झोन'मध्ये येते. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली नसून ही वस्तू ड्रोन असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त करत अधिक माहिती देण्यास नकार दिला.प्राथमिक माहितीनुसार, 7 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पंतप्रधान निवासाच्या व्हीआयपी परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना उडती तबकडी दिसली. त्यानंतर तातडीने शोध मोहीम हाती घेण्यात आली. नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यात आली. परंतु, UFO चा पत्ता लागू शकला नाही. त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून परिस्थिती ठीक असल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आला. याविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अशाप्रकारची घटना घडल्याचे कबूल केले. मात्र, याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. याठिकाणी UFO घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले, परंतु त्यामुळे कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली नव्हती. सुरक्षेच्या कारणास्तव यापेक्षा अधिक माहिती देता येणार नाही, असे दिल्ली पोलीस दलाचे मुख्य प्रवक्ते दिपेंद्र पाठक यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली