शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘उडान’ स्वस्त विमानसेवेत महाराष्ट्राऐवजी गुजरातला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:04 IST

नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली. विषय होता नाशिकसह महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांना जोडणा-या ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी हवाई सेवेचा. ‘उडान’ सेवेबाबत जीव्हीके कंपनीने गुजरातला प्राधान्य देऊन, महाराष्ट्रातील सर्व छोट्या शहरांवर अन्याय केल्याचा आरोप खा. गोडसे यांनी केला. तसेच १५ डिसेंबरपर्यंत अन्याय दूर झाला नाही तर शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत आंदोलन करतील, असा इशाराही गोडसेंनी नागरी वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांना दिला.खा. गोडसे म्हणाले की, देशभरातील छोटी विमानतळे मोठ्या शहरांना जोडली जावीत, यासाठी केंद्र सरकारने आॅक्टोबर २0१६ मधे उडान योजनेची घोषणा केली. एअर डेक्कन कंपनीला नाशिक-पुणे, नाशिक- मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर या हवाई मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यास मान्यता दिली आणि ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे आदेशही दिले. नाशिकची निवड झाल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली विमानसेवा मार्गी लागणार असा आनंद आम्हा सर्वांना झाला.त्यानंतर आॅगस्टमध्ये मुंबईत टाइम स्लॉटसंदर्भात बैठका सुरू झाल्या. हवाई वाहतूक मंत्रालयाने जीव्हीके या खासगी कंपनीला टाइम स्लॉट विचारण्याऐवजी आदेश द्यायला हवा होता. तसे न केल्याने जीव्हीकेने गुजरातच्या सुरत, कांडला आणि पोरबंदर विमानतळांची निवड करून महाराष्ट्राची विमानसेवा वाºयावर सोडून दिली.साहजिकच नाशिकची विमानसेवा ३0 सप्टेंबर रोजी सुरू झाली नाही, असे सांगून, उडान सेवेत गुजरातला प्राधान्य देताना महाराष्ट्राला का वगळले? उडान सेवेचाअग्रक्रम केंद्र सरकार ठरवणार की जीव्हीके कंपनी, असा सवाल खा. गोडसे यांनी केला.विमान प्रवास हे सामान्यजनांचे स्वप्न आहे. नाशिक वा महाराष्ट्रातील सर्व छोटी शहरे त्यास अपवाद नाहीत. मोदी सरकारने १५ डिसेंबरच्या आत जीव्हीके कंपनीला सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास भाग न पाडल्यास शिवसेनेला मोदी सरकारविरुद्धच आंदोलन करावे लागेल, असा सक्त इशारा देण्यासाठीच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात आाला, असे हेमंत गोडसे म्हणाले.

टॅग्स :Gujaratगुजरात