शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या स्वप्नांना बळ देतोय बाबा! मुलीच्या UPSC परीक्षेसाठी वडील रिक्षामध्ये करताहेत अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:59 IST

मुलांच्या प्रत्येक आनंदासाठी पालक शक्य तितके प्रयत्न आणि परिश्रम करण्यास तयार असतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका उबेर ऑटो ड्रायव्हरच्या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या लेकीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हा बाप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जगभरातील प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या खूप शिकावं आणि आयुष्यात काहीतरी चांगले करावं ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. मुलांच्या प्रत्येक आनंदासाठी पालक शक्य तितके प्रयत्न आणि परिश्रम करण्यास तयार असतात. उबेर ऑटो चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदाची काळजी घेणाऱ्या राकेश यांच्या बाबतीतही असंच काहीसं आहे.

लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिजीत मुथा नावाच्या युजरने राकेश नावाच्या एका उबेर ऑटो ड्रायव्हरची गोष्ट आपल्या अकाऊंटवर पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी पालक किती मदत करतात. अभिजीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्याने आदल्या दिवशी एक उबेर ऑटो बुक केली, जी राकेश नावाचा ड्रायव्हर चालवत होता. याच दरम्यान ड्रायव्हरने त्याचा यूट्यूब व्हिडीओ थांबवला आणि नेव्हिगेशन सुरू केले.

काही वेळातच थांबलेला व्हिडीओ पुन्हा प्ले होऊ लागला, ते पाहून अभिजीतने उबेर ऑटो चालकाला विचारले की तो काय पाहत आहे? यावर उबर ऑटो चालक राकेशने उत्तर दिले की, तो चालू घडामोडी आणि अर्थशास्त्राची माहिती घेत आहे. यावर अभिजीतने कोणत्या परीक्षेची तयारी करताय? असा प्रश्न विचारला. त्यावर राकेश म्हणाला की, माझी मुलगी यूपीएससीची तयारी करत आहे, मी पण तिला थोडी मदत करतो, रोज संध्याकाळी जेव्हा ती लायब्ररीतून येते तेव्हा आम्ही अशी चर्चा करतो. अभिजीतने उबेर ऑटो ड्रायव्हरच्या या गोष्टी त्याच्या लिंक्डइन अकाउंटवर शेअर केल्या आहेत, ज्या आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट पाहिली असून लाईक केलं आहे. या पोस्टला आतापर्यंत एक लाख लोकांनी लाईक केलं आहे, तर 1,755 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच वेळी, या पोस्टवर 1,583 लोकांनी कमेंट केल्या आहेत. पोस्ट पाहिल्यानंतर यूजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत आणि उबर ऑटो चालकाचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'पालक फक्त हेच असतात. आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असतात. देव तिला आशीर्वाद देवो' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"