कानपूर: संकटाच्या काळात रक्तदान करुन मुस्लिम महिलेचे प्राण वाचवणाऱ्या अभिमन्यू गुप्ता यांचं कौतुक आता परदेशातूनही होऊ लागलं आहे. अभिमन्यू यांच्या या कृतीची संयुक्त अरब अमिरातीच्या राजकुमारीनं प्रशंसा केली आहे. त्यांनी अभिमन्यू गुप्ता यांच्यासह भारतीय मूल्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.फर्रुखाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या सैनिक कुटुंबाच्या सदस्य असलेल्या ५५ वर्षीय शहाना बेगम यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. त्यांना डायलिसिससाठी कानपूरच्या हवाई दलाच्या रुग्णालयात जायचं होतं. डायलिसिससाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. त्यांचे पती निसार खान आणि मुलगा शैजी खान यांनी अनेकांकडे मदत मागितली. मात्र हाती निराशा आली. त्यांच्या नातेवाईकांनीदेखील मदत करण्यास असमर्थतता दर्शवली.
मुस्लिम महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हिंदू व्यक्तीचं रक्तदान; यूएईची राजकुमारी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 16:39 IST