शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
3
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
4
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
5
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
6
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
7
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
8
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
9
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
10
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
11
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
12
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
13
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
14
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
15
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
17
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
18
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
19
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:31 IST

दहशत। उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडहून येणाऱ्या कामगारांत भीती

पुलवामा : राजस्थानातील एका ट्रकचालकाची १४ आॅक्टोबर रोजी काश्मिरात शोपियानमध्ये अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरात चार हत्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पुलवामात एका बाहेरील मजुराची, तसेच बाहेरील ट्रकचालक, एक स्थानिक सफरचंद व्यापारी यांची हत्या झाल्याने तणाव आहे. दोन आठवड्यांत झालेल्या ५ हत्यांमुळे कामगार, बाहेरील लोकांतही भीती आहे.

५ आॅगस्ट रोजी काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत आहे, तसेच काश्मिरात दाखल झालेले बाहेरील मजूर सुरक्षेच्या कारणास्तव परत गेले आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूरचा रहिवासी २५ वर्षीय गोपाल कुमार कर्ण हा पुलवामात वीटभट्टीवर मजूर आहे. तो सांगतो, आपले वडीलही येथे वीटभट्टीवर काम करीत होते. ते आमच्या पूर्ण कुटुंबाला येथे घेऊन आले. माझ्या दहा महिन्यांच्या मुलाचाही जन्म येथीलच आहे. या ठिकाणी वीटभट्टीवर काम करणारे १४० हून अधिक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड भागातील आहेत. कामाच्या +शोधात ते काश्मिरात येतात. दोन कामगार एका दिवसात २००० विटा भाजू शकतात. त्याबदल्यात त्यांना प्रति दिन ५०० ते ७०० रुपये मिळतात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरीचे हे दर कमी आहेत. स्थानिक मजूर प्रति दिन १५०० रुपये घेतात. काश्मिरात ८३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतश्रीनगर : काश्मिरातील जनजीवन ८३ व्या दिवशीही विस्कळीतच होते. मुख्य बाजारपेठा बंद होत्या. काही भागात सकाळी काही तासांसाठी दुकाने उघडली होती. मात्र, ११ वाजता ही दुकानेही बंद झाली. थोड्या वेळातच या दुकानांत एकच गर्दी उसळली होती आणि रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॅफिक जाम होती. काश्मिरात अद्यापही इंटरनेट सेवा बंद आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर