शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवाल्यांना ‘आयुष्यमान’ नाही ; मोदी आरोग्यविम्याचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 06:06 IST

तुमचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांहून अधिक असेल किंवा तुमच्याकडे फ्रीज अथवा दुचाकी वाहन असेल, तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्यविमा योजनेचे लाभ तुम्हाला मिळणार नाहीत.

नवी दिल्ली : तुमचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांहून अधिक असेल किंवा तुमच्याकडे फ्रीज अथवा दुचाकी वाहन असेल, तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्यविमा योजनेचे लाभ तुम्हाला मिळणार नाहीत.जे लाभार्थींच्या निकषात वास्तविक बसत नाहीत, अशा काही आमदार-खासदारांना व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही या योजनेची कार्ड देण्यात आले. हे निदर्शनास आल्यानंतर राज्यांना वरीलप्रमाणे आर्थिक स्थिती असणाºया कुटुंबाना लाभार्थींमधून वगळण्यास सांगण्यात आले आहे, असे ही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या ‘नॅशनल हेल्थ एजन्सी’कडून सांगण्यात आले.सन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या सामाजिक-आर्थिक व जात जनगणनेत (एसईसीसी) ज्यांचे वर्गीकरण ‘वंचित’ वर्गात केले गेले आहे, अशा १०.२१ कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल, असे सरकारने आधी जाहीर केले होते. यामुळे सुमारे ५० कोटी नागरिकांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचा इस्पितळातील उपचारांचा खर्च आरोग्यविम्यातून मिळेल, असा सरकारचा दावा आहे.नॅशनल हेल्थ एजन्सीने राज्यांना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ही जनगणना २०११ मध्ये झाल्यानंतरहीआणखी माहिती गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तरीही जे पात्रता निकषात बसत नाहीत, असे अनेक जण लाभार्थींमध्ये समाविष्ट झाल्याची उदाहरणे असू शकतात. ती शोधून त्यांना यादीतून वगळण्यात यावे.यांनाही लाभ मिळणार नाही- २.५ एकराहून अधिक सिंचित शेतजमीन, ७.५ एकर शेतजमीन व सिंचन उपकरणे असलेले- मच्छीमार बोट असणारे- लँडलाइन टेलिफोन असणारे- दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी वाहन असणारे- ५० हजारांहून अधिकच्या क्रेडिटची किसान क्रेडिट कार्डधारक- प्राप्तिकर,व्यवसायकर भरणारे- कुटुंबात सरकारी कर्मचारी असलेले

टॅग्स :Medicalवैद्यकीयNarendra Modiनरेंद्र मोदी