शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वर्षभरात दोन हजार किमी रेल्वेमार्ग

By admin | Updated: November 6, 2015 01:00 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या रेल्वेचे गाडे रुळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलण्याच्या दिशेने उपाययोजना चालविल्या आहेत. त्यांना सुधारणांच्या

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या रेल्वेचे गाडे रुळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलण्याच्या दिशेने उपाययोजना चालविल्या आहेत. त्यांना सुधारणांच्या ‘बुलेट ट्रेन’ला गती देण्यासाठी बरीच मजल गाठायची आहे. प्रवासाच्या सुविधांमध्ये वाढ ते रेल्वेमार्गांचा विस्तार अशा विविध आघाड्यांवर घेण्यात आलेल्या रेल्वेच्या कामगिरीचा आढावा असा आहे.अर्थसंकल्पातील पथदर्शक पावले...मध्यम काळातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ८.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचा ‘मास्टर प्लॅन’. योजना आराखड्यात एक लाख कोटींपेक्षा जास्त वाढ. तरतुदीत यापूर्र्वीपेक्षा ५२ टक्क्यांनी वाढ. प्रथमच एलआयसीकडून कमी दरातील दीर्घ मुदतीचा संस्थात्मक निधी.(पाच वर्षांसाठी १.५ लाख कोटींचा आराखडा) दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरण, वाहतूक सेवेसाठी निधीची क्षमता वाढविली. दुहेरीकरणाचे आजवरचे सर्वात मोठे १२०० कि.मी. चे लक्ष्य. रेल्वेमार्गाची एकूण लांबी २५०० कि.मी. विद्युतीकरणाचे सर्वात मोठे लक्ष्य-१६०० कि.मी. ८४ अर्थसंकल्पीय घोषणांची यापूर्वीच अंमलबजावणी. त्यात असंख्य माहिती- तंत्रज्ञान (आयटी) आणि प्रवासी सुविधांचा समावेश. यापैकी काही सुविधा अशा आहेत : सर्वांसाठी हेल्पलाईन- १३८,१२८, बिगर वातानुकूलित डब्यांमध्ये कचरापेट्या बसविणे, ई-कॅटरिंग, आरक्षण क्षमता वाढविण्याचा प्रयत्न. रेल्वे रद्द झाल्यास, परताव्यासंबंधी नियम अधिक मुक्त. मोबाइल- तिकीट, पाण्याचे वेंडिंग मशिन्स, ११ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा.२०१५-१६ या वर्षातील आजवरच्या उपलब्धी...आॅगस्टपर्यंत योजना खर्चासाठी २७ हजार कोटी रुपये यापूर्वीच खर्च. जपानच्या ओडीएच्या माध्यमातून वेस्टर्न डीएफसी प्रकल्पात २०० इंजिनच्या (९ हजार अश्वशक्ती) उत्पादनासाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च. रेवाडी येथे देखभाल सुविधा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण. ३० जून २०१५ रोजी त्याबाबत निविदा जारी. आरएफपीसाठी पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवड. भारतात होणार रेल्वेच्या संचाचे उत्पादन.490कि.मी.चा ब्रॉडगेज नेटवर्क विस्तार, त्यात १६९ कि.मी. चे नवे मार्ग, १२२ कि.मी. जीसी आणि १९९ मार्गाचे दुहेरीकरण. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेला आग्रा- इटावा नवा रेल्वेमार्ग (१०८ कि.मी.) कार्यान्वित. लोहारू-सिकार जीसी (१२२ कि.मी.) कार्यान्वित.डाल्लीराजहरा- डोंडी (१७ कि.मी.) या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात नवा रेल्वेमार्ग कार्यान्वित. टुना बंदराला रेल्वेमार्गाची जोडणी. रेल्वेच्या चाकांचा निर्मिती प्रकल्प बेला येथे कार्यान्वित आॅगस्ट २०१४ पासून नियमित उत्पादन सुरू. चेन्नईत नोव्हेंबर २०१४ मध्ये एलएचबी डब्यांचा दुसरा कारखाना सुरू. जानेवारी २०१५ मध्ये हल्दिया येथे डेमू कारखाना सुरू. एलएचबी डब्यांच्या चौकटींचा कारखाना मार्च २०१५ मध्ये कार्यान्वित. एकूण २४,४५७ जैव- शौचालयांचा समावेश.(एप्रिल ते आॅगस्ट २०१५ मध्ये ४७११ जैव शौचालये.)दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसमध्ये चाचणीसाठी जगातील पहिले बायो-कम- व्हॅकूम शौचालये बसविण्यात आले. देशांतर्गत भांडवलातून ३१८ नव्या आॅटो-कार वॅगनची क्षमता वाढविली. नव्या डिझाइनच्या स्टील कॉइल वॅगनचा विकास. कोळसा वाहून नेण्यासाठी देशी बनावटीची २५ टन अ‍ॅक्सल लोड वॅगन विकसित.महत्त्वपूर्ण मार्ग आणि जोडणी...1983कि.मी. लांब आजवरचे सर्वाधिक कार्यान्वित रेल्वेमार्ग (७२३ कि.मी. दुहेरी मार्ग)1375आरकेएमचे सर्वाधिक विद्युतीकरण. अंमलबजावणीचे प्रमाण ९१.२ टक्के. सात वर्षांत प्रथमच मोठी उपलब्धी.उधमपूर- कटरा, दुधनोई- मेंढपठार, मेघालयमधील पहिली रेल्वेलिंक.लुमडिंग- बदरपूर- सिलचर-रुंदीकरण- बराक खोरे.झारखंडमधील कोडेर्मा- हजारीबाग- नक्षलग्रस्त जिल्हा.भिंड- इटावा मार्ग पूर्ण. गुना- ग्वाल्हेर- इटावा रेल्वेमार्ग कासगंज- बरेली, ब्रॉडगेज.2015-16या वर्षाच्या अर्थसंकल्पात ७७ क्षमता विस्तार प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी निधी पुरविल्यानंतर सहा महिने ते अडीच वर्षांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. कार्यान्वित झालेल्या अशा प्रकल्पांचे निकाल पुढील वर्षापासून दिसू लागतील. यासंबंधी निविदांचे सर्व अधिकार रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.