शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक अजूनही सुरू

By admin | Updated: July 3, 2017 11:20 IST

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील बमनू परिसरात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 -  जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील बमनू परिसरात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर आणखी एका दहशतवाद्याला घेरण्यात आले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.  दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाकडून सकाळपासूनच शोधमोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.  
 
दरम्यान, शनिवारी (1 जुलै) ""लष्कर-ए-तय्यबा""चा कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू होती. या चकमकीदरम्यान दोघांना ठार करण्यात आले.  मात्र या चकमकीदरम्यान दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. 
 
सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, "दहशतवादी एका घरात लपून बसले होते. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू असताना गोळ्या लागल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला", अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले.  सुरक्षा जवानांनी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी बशीर लष्करी असल्याची तेव्हा माहिती मिळाली होती. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. 16 जून रोजी ही हत्या करण्यात आली होती.