शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: June 21, 2017 11:01 IST

जम्मू-काश्मिरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

सोपोर, दि. 21-  जम्मू-काश्मिरच्या बारामुल्ला भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. सोपोरमध्ये बुधवारी सकाळी दडून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसंच त्यांच्याकडून शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.  गुलजार अहमद आणि बासित अशी या दोन दहशतवाद्यांची नावं असून ते दोघे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहेत.
 
सोपोरमध्ये काही दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरूच ठेवली आहे, अशी माहिती सुरक्षा दलाकडून मिळते आहे. "एएनआय’ वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.  सोपोर आणि परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच लष्करानं संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे, अशीही माहिती मिळते आहे.