मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या
मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या
मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्याप्रवाशांसाठी सुविधा : वेटिंग वाढल्यामुळे घेतला निर्णयनागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि प्रतीक्षायादी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-नागपूर दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०१३ छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर ही गाडी १९ फेब्रुवारीला रात्री १२.२० वाजता सुटुन त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी बडनेराला सकाळी ११.२० वाजता, धामणगावला दुपारी १२ वाजता, पुलगावला दुपारी १२.१८ वाजता, वर्धाला दुपारी १२.४५ वाजता येईल. रेल्वेगाडी क्रमांक ०१०१४ नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ही गाडी १९ फेब्रुवारीला रात्री ९.१५ वाजता सुटून छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी १.२० वाजता पोहोचेल. ही गाडी वर्ध्याला रात्री १०.५०, पुलगावला रात्री ११.२०, धामणगावला रात्री ११.४०, बडनेराला रात्री १२.३५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकूण २३ कोच असून त्यात १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १२ स्लिपर, ५ साधारण द्वितीयश्रेणी आणि २ एसएलआर कोच राहतील. (प्रतिनिधी)..............