शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा हल्ला उधळला, बॅटच्या दोन कमांडोंना कंठस्नान, भारताचा एक जवान हुतात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 21:10 IST

पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळपासून पुंछमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये बॅटच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू होता.

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याच्या बॉर्डन अॅक्शन टीमने (बॅट) केलेल्या भ्याड हल्ला नियंत्रण रेषेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. या कारवाईत पाकिस्तानी सैन्यातील स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या दोन कमांडोंना कंठस्नान घालण्यात आले. तर भारताच्याही एका जवानाला हौतात्म आले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळपासून पुंछमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये बॅटच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाकिस्तानने केलेला हा हल्ला परतवून लावण्यासाठी नियंत्रण रेषेवरील फॉरवर्ड पोस्टवर असलेल्या जवानांनी प्रत्युत्तरदाखल कारवाई सुरू केली. या कारवाईत पाकिस्तानच्या स्पेशन सर्व्हिस ग्रुपच्या दोन कमांडोंना ठार करण्यात आले. यादरम्यान दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले.  मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी कमांडोंनी सुंदरबनी विभागातील नाथुआ का टिब्बा या पोस्टवर हल्ला केला. या हल्ल्यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. मात्र या चकमकीवेळी भारतीय लष्कराचे रायफलमॅन सुखविंदर सिंह यांना हौतात्म्य आले.   दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने हल्ला केलेली नाथुआ का टिब्बा ही चौकी तीन बाजूंनी पाकिस्तानी पोस्टनी वेढलेली आहे. पाकिस्तानने यापूर्वीही या चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान