दोन मोटारसायकलींची धडक; १ ठार, ४ जखमी
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
कसबा सांगाव : मौजे सांगाव (ता. कागल) येथील इंदिरानगर जवळील तळ्याजवळ काल रात्री १० वा. दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत विश्वास शंकर माने (वय २५) हा ठार झाला. त्यांच्यासोबत असणारी मित्राची बहीण सौ. अनिता अनिल शिंदे (वय ३१) या गंभीर जखमी झाल्या. तर आशुतोष अनिल शिंदे (वय २२), व दुसर्या गाडीवरील सोमनाथ उर्फ बबलू भिकाजी माने (वय २०) व संभाजी नवरेकर (रा. बेळगाव) हे जखमी झाले.
दोन मोटारसायकलींची धडक; १ ठार, ४ जखमी
कसबा सांगाव : मौजे सांगाव (ता. कागल) येथील इंदिरानगर जवळील तळ्याजवळ काल रात्री १० वा. दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत विश्वास शंकर माने (वय २५) हा ठार झाला. त्यांच्यासोबत असणारी मित्राची बहीण सौ. अनिता अनिल शिंदे (वय ३१) या गंभीर जखमी झाल्या. तर आशुतोष अनिल शिंदे (वय २२), व दुसर्या गाडीवरील सोमनाथ उर्फ बबलू भिकाजी माने (वय २०) व संभाजी नवरेकर (रा. बेळगाव) हे जखमी झाले. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, विश्वास माने हा शाहू कारखान्यामध्ये नोकरीस होता. रात्री ८ वा. कामावरून आल्यानंतर ९.३० वा. मित्राची बहीण सौ. अनिता यांना त्यांच्या घरी इंदिरानगर येथे घरी सोडण्यास जात होता. त्याचवेळी समोरून येणारी सोमनाथ यांची मोटारसायकल आणि विश्वास यांच्या मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये विश्वासच्या मोटारसायकलीचे मॅगवेल चाक तुटले होते. या अपघाताची माहिती शेजारी कळताच त्यांनी जखमींना कोल्हापूर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये हलविले. रात्री उशिरा विश्वासला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विश्वास याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दोन वर्षांची मुलगी आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे.अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केवार करीत आहेत.