शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला; महिलेचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:26 IST

मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

अलवार: रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना  राजस्थानमधील अलवारमध्ये घडली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मुस्लिम दाम्पत्य हरयाणाला जात असताना अलवारच्या बस स्थानकात दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत तिच्यासोबत गैरवर्तन केलं. अलवारच्या बस स्थानकात मुस्लिम दाम्पत्य त्यांच्या मुलासह जेवत होतं. त्याचवेळी दोन तरुण तिथे आले. त्यांनी दाम्पत्याला रामाचा जयजयकार करण्यास सांगितलं. यानंतर या तरुणांनी पतीला मारहाण केली आणि महिलेशी असभ्य वर्तन केलं. दाम्पत्याला मारहाण करणाऱ्यांची नावं वंश भारद्वाज आणि सुरेंद्र भाटिया असल्याची माहिती मिळत आहे. भारद्वाज आणि भाटिया यांनी मारहाण करताच मुस्लिम दाम्पत्यानं मदतीसाठी याचना सुरू केली. यानंतर परिसरातील काही जण मदतीसाठी धावले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुस्लिम दाम्पत्यानं भारद्वाज आणि भाटिया यांचा विरोधात अलवारमधील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाम्पत्य पीडित महिलेच्या माहेराहून (दिंडवाना) हरयाणातील नूहमधील त्यांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. दाम्पत्य आणि त्यांचं लहान मूल अलवारच्या बस स्थानकात जेवत असताना दोन जण तिथे आले. त्यांनी दाम्पत्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मुस्लिम हिंदुस्तानात राहतात. मात्र ते रामाचा जयजयकार करत नाहीत, असं म्हणत दोघांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप दाम्पत्यानं केला.  

टॅग्स :Muslimमुस्लीम