ऑनलाइन लोकमत
गोरखपूर, दि. १ - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे दोन एक्स्प्रेसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात १२ जण ठार तर ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
मंगळवारी मध्यरात्री गोरखपूर कॅन्टोन्मेंट स्थानकाजवळ कृषक एक्स्प्रेस व बरौनी एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसची टक्कर झाली. या अपघातात बैरौनी एक्स्प्रेसचे तीन डबे तर कृषक एक्स्प्रेसचा एका डबा रुळांवरून घसरला. अपघातात १२ प्रवाशांना जीव गमवावा लागला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिस व रेल्वेच्या बचावपथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर गंभीर जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गाडीचे चालक व सहचालकाला निलंबित करण्यात आले आहे.