शहरातील दोन बालक बेपत्ता
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
शहरातील दोन बालक बेपत्ता
शहरातील दोन बालक बेपत्ता
शहरातील दोन बालक बेपत्तागुन्हा दाखल : वडील रागावल्यामुळे सोडले घरनागपूर : अभ्यासावरून वडील रागावल्यामुळे १५ वर्षाचा बालक घरून निघून गेल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुकानात काम करण्यासाठी गेलेला १४ वर्षाचा बालक घरी न परतल्यामुळे तहसिल पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशोक राजू मडावी (४१) रा. दशरथनगर, गिट्टीखदान यांचा १४ वर्षाचा मुलगा अमन मडावी हा इतवारीच्या हसन अली अँड ब्रदर्सच्या दुकानात काम करतो. नेहमीप्रमाणे तो दुकानात काम करण्यास गेला. परंतु घरी न परतल्यामुळे अशोक मडावी यांनी तहसिल पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुटीबोरीच्या इंडोरमा कॉलनीत कार्यरत जगदीश मारुती शेंडे (४०) यांचा १५ वर्षाचा मुलगा प्रज्वल ऊर्फ पप्पू यास जगदीश शेंडे हे अभ्यासाच्या कारणावरून रागावले. त्यामुळे प्रज्वल आपल्या वडिलांच्या मोठ्या भावाकडे शिवाजीनगर हनुमान चौक येथे गेला. मुलाला आणण्यासाठी जगदीश आपल्या भावाच्या घरी गेले. तेथे प्रज्वलने शौचास जाण्याचा बहाणा करून तेथून निघून गेला. जगदीश शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)