शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

इस्त्रोचं आज व्यावसायिक उड्डाण, दोन ब्रिटीश उपग्रह प्रक्षेपित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 09:18 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज व्यावसायिक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज व्यावसायिक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी42 श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे. आजचं सॅटेलाईट प्रक्षेपण हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचं इस्त्रोच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

नोव्हा एसएआर आणि इंग्लंडच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एस वन-फोर या पृथ्वीचे निरिक्षण करणाऱ्या उपग्रहांना वाहून नेणारे इस्त्रोचे पीएसएलव्ही-सी42 हे यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर उड्डाणासाठी तयार होत आहे. रविवारी (16 सप्टेंबर) रात्री 10 वाजून सात मिनिटांनी यांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचं वजन 800 किलोग्राम आहे.  blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

#Visuals: ISRO will launch PSLV-C42 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota in #AndhraPradesh, tomorrow. The PSLV will carry two foreign satellites, NovaSAR & S1-4, into space. pic.twitter.com/jsFMEAFAZE

— ANI (@ANI) September 15, 2018

इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी याआधी इस्रो सात महिन्यात 19 अभियानं राबवणार असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये 10 सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर ते मार्च या महिन्यात या मोहिमा राबवण्यात येणार आहेत.  पीएसएलव्ही-सी42 च्या प्रक्षेपणाने 16 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाहुबली नावाने जीएसएलव्ही एमके 3- डी 2 या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच पीएसएलव्ही सी 43 याचेही प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. जी सॅट 7 ओ आणि जी सॅट 11 या उपग्रहांचे नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 44 आणि जीसॅट 31 अंतराळात सोडण्यात येणार आहेत. 2019 या नवीन वर्षात इस्रोची बहुप्रतीक्षीत चांद्रयान 2 मोहीम 3 ते 16 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहे.

टॅग्स :isroइस्रो