शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

दोन बड्या रुग्णालयांचे परवाने झाले रद्द, बेजबाबदार वर्तणूक; हरयाणा व दिल्ली सरकारचे निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:02 IST

७ वर्षांच्या मुलीच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूनंतर, तिच्या पालकांना १६ लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडणाºया फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टा करार हरयाणा सरकारने रद्द केला आहे.

गुरगाव/ नवी दिल्ली : ७ वर्षांच्या मुलीच्या डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूनंतर, तिच्या पालकांना १६ लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडणाºया फोर्टिस रुग्णालयाचा भाडेपट्टा करार हरयाणा सरकारने रद्द केला आहे. दुसरीकडे जिवंत बाळाला मृत घोषित करणाºया मॅक्स हॉस्पिटलचाही परवाना दिल्ली सरकारने रद्द केला आहे.हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी फोर्टिस रुग्णालयाचा करार, तसेच रुग्णालाचे काही परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.गुरगावच्या फोर्टिस रुग्णालयाच्या रक्तपेढीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे आणि बेजबाबदार वर्तणुकीसाठी रुग्णालयाविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. चौकशीमध्ये रुग्णालयाने बिलाची रक्कम ७00 टक्के वाढविल्याचे आढळून आले होते. आद्या सिंग या ७ वर्षांच्या मुलीला ३१ आॅगस्ट रोजी फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. ती १४ सप्टेंबर रोजी मरण पावली. त्यानंतर, रुग्णालयाने दोन आठवड्यांचे १५ लाख ६0 हजार रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडले. त्यात ६११ सीरिंग्ज, १,५४६ ग्लोव्हज्, औषधे, व्हेंटिलेटरचा खर्च, वेदनाशामके, प्रतिजैवके, रुग्णालयात तिला घालण्यास दिलेला गाऊन यांचा समावेश होता. दिल्लीतील शालीमार बाग परिसरात असलेल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन मुलांना जन्म दिला. त्यापैकी एक जिवंत व दुसरे जन्मत:च मृत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. नंतर दोन्ही बाळे मरण पावल्याचे सांगून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पॉलिथीनच्या पिशवीत गुंडाळून पालकांकडे सोपवले.अंत्यसंस्कारांसाठी जात असताना पिशवीत हालचाल जाणवली, तेव्हा दोनपैकी एक मूल जिवंत असल्याचे समजले. त्या मुलाला तातडीने दुसºया रुग्णालयात दाखल केले. मात्र, ते मूलही दोन दिवसांनी दगावले. या सगळ्या प्रकारात मॅक्स हॉस्पिटलने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी परवानाच रद्द केल्याचे सांगितले. या हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मोठाच धक्काएकाच दिवशी दोन राज्यांनी बड्या रुग्णालयांचे परवाने रद्द केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूपच खळबळ उडाली आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी जे प्रकार घडले, त्याचे समर्थन करणे शक्यच नाही, असे डॉक्टरांनी बोलून दाखविले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलIndiaभारत