शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 28, 2017 01:01 IST

जम्मू आणि काश्मिरातील हिमस्खलन बळींची संख्या वाढूून २४ वर पोहोचली असताना जम्मू-श्रीनगर महामार्गावर शुक्रवारीही हिमस्खलन

हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यूश्रीनगर/बनिहाल : जम्मू आणि काश्मिरातील हिमस्खलन बळींची संख्या वाढूून २४ वर पोहोचली असताना जम्मू-श्रीनगर महामार्गावर शुक्रवारीही हिमस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत २0 जण मरण पावल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.गुरेझमधील हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या चार सैनिकांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची संख्या २४ झाली. गुरेझमध्ये बुधवारी हिमस्खलनाच्या घटना घडून अनेक सैनिक बर्फाखाली दबले होते. सात जणांना गुरुवारी जिवंत बाहेर काढण्यात यश आले. तथापि, १० सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. बचाव पथकांना त्यांचे मृतदेहच आढळले. उरी (जि. बारामुल्ला) भागात हिमस्खलन होऊन फतेह मोहंमद मुघल (६०) यांचा मृत्यू झाला. ते सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले. पोलीस आणि स्थानिकांनी त्यांना बर्फाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जम्मू आणि काश्मिरात गेल्या चार दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. काश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तुफान हिमवृष्टीमुळे बुधवारी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हिमस्खलन बचाव पथकांनी (एआरटी) शहीद जवानांचे मृतदेह हुडकून काढले. (वृत्तसंस्था)अशा घडल्या दुर्घटना२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गुरेझ खोऱ्यात महाझगुंड गावाजवळील लष्करी छावणीला हिमस्खलनाचा तडाखा बसला. यात तीन तंबू बर्फाखाली गाडले जाऊन सैनिक अडकले. छावणीतील इतर सैनिक आणि महाझगुंड गावातील लोकांनी तात्काळ मदतकार्य केल्यामुळे सहा सैनिकांचे प्राण वाचले.दुर्दैवाने तीन सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. एआरटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी या सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले. याचवेळी गुरेझच्या निरू भागाजवळ लष्कराचे गस्ती पथक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून ११ सैनिक बर्फाखाली अडकले. यापैकी एकाही सैनिकाला वाचविता येऊ शकले नाही.