जम्मू : महापुराची भीषण आपत्ती ओढवलेल्या जम्मू-काश्मिरातील 2़26 लाख पूरग्रस्तांना वाचविण्यात आले आह़े तथापि, 14 दिवसांनंतरही अद्यापही हजारो लोक पुरात अडकलेले आहेत़ त्यांच्या बचाव व मदतीचे काम सुरू आह़े
सशस्त्र दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने आतार्पयत पूरग्रस्त भागातून 2,26,क्क्क् लोकांची सहीसलामत सुटका केली आह़े एकटय़ा लष्कराने 1़4क् लाख लोकांना वाचविले आह़े आता सशस्त्र दलाने जम्मूत ‘मिशन राहत’ तर काश्मीर भागात ‘मिशन सहायता’आरंभले आह़े 3क् हजारांवर लष्करी जवान मदत व बचावकार्यात गुंतले आह़े कित्येक लाख लिटर पिण्याचे पाणी आणि 1क्54 टन अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आह़े अनेक भागांत पुराचे पाणी साचले आहेत़ ते बाहेर काढण्याचे कामही सुरू आह़े
दरम्यान, जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची आवक ठप्प पडली आह़े त्यामुळे या भागात या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला
आह़े
3क्क् किमी लांबीचा हा महामार्ग जम्मू-काश्मीरची जीवनरेषा मानला जातो़ या महामार्गाद्वारे खो:यात आवश्यक मालाचा पुरवठा केला जातो़ पुरामुळे गेल्या 12 दिवसांपासून तो बंद आह़े यामुळे ताज्या भाज्या, गॅस सिलिंडर, अन्नधान्याचा तुटवडा भासत आह़े गत 11 दिवसांपासून पुरामुळे ठप्प पडलेली काश्मीर खो:यातील रेल्वेसेवा आज सोमवारी अंशत: सुरू झाली़ श्रीनगर आणि बारामुल्लादरम्यान चार रेल्वेगाडय़ा धावल्या़ उर्वरित भागांतील रेल्वेसेवाही लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत़(वृत्तसंस्था)
एकटय़ा श्रीनगरवर नाही तर अन्य जिल्ह्यांवरही लक्ष द्या -सर्वोच्च न्यायालय
4नवी दिल्ली : केवळ श्रीनगरमध्येच नाही तर राज्याच्या अन्य भागांतही पूरस्थिती अतिशय गंभीर आह़े त्यामुळे बचाव आणि मदतकार्य केवळ श्रीनगरमध्ये केंद्रित न करता अन्य जिल्ह्यांवरही लक्ष द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर सरकारला दिले आहेत़ त्याच वेळी जम्मू-काश्मिरातील पुराच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्राने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आह़े
4मुख्य न्यायाधीश न्या़ आऱ एम़ लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी राज्यात पुरेशा प्रमाणात मदत आणि बचाव सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करणा:या अनेक याचिकांवर संयुक्त सुनावणी केली़ मदतीचा सर्व ओघ व लक्ष श्रीनगरवर केंद्रित झाले आह़े मात्र कुलगाम, अनंतनाग, शोपियान पुलवामा, बारामुल्ला व बडगाम या जिल्ह्यांकडे तेवढी सक्रियतेने मदत पोहोचल्याचे चित्र नाही़ श्रीनगरप्रमाणोच या जिल्ह्यांतील स्थितीही गंभीर आहे, असे खंडपीठाने स्पष्टपणो म्हटल़े