शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 07:14 IST

उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे.

कानपूरः उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे. अचानक धावत्या ट्रेनचे 12 डबे घसरल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हावडा येथून नवी दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेस (12303)ला शुक्रवारी रात्री जवळपास 1 वाजताच्या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली आहे. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. या डब्यामध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. रात्री अडीच 2.30 जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून, डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.रेल्वे प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून, 05122323015 या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितलं आहे. 

टॅग्स :Kanpur Policeकानपूर पोलीस