शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा पोलिसांविरोधातील ट्वीट, दिग्विजय सिंह गोत्यात

By admin | Updated: May 4, 2017 18:10 IST

इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना तेलंगणा पोलीस उकसवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे केला होता.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना तेलंगणा पोलीस उकसवत असल्याचा गंभीर आरोप  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे केला होता. दिग्विजय सिंहांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता तेलंगणा पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  असे आरोप करून पोलिसांची प्रतिमा मलिन आणि त्यांचे खच्चीकरण केले आहे, असे तेलंगणातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 
सिंह यांनी सोमवारी ट्विट करून तेलंगणा पोलीस मुस्लिम तरुणांना ‘कट्टरपंथी’ बनवण्यासाठी तसेच दहशतवादी संघटनांचे बोगस संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे‘आयसिस’साठी काम करण्यास चिथावणी देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. 
 
मुस्लिम तरुणांना जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांना आयसिसमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या पोलिसांना ‘आदेश’ दिले असल्यास त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असेही सिंह म्हणाले होते. राव यांनी असं काही केलं नसल्यास या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती.या आरोपांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.