शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

२० लाखांपर्यंतची उलाढाल; कारागीरांना जीएसटीतून सूट - जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:52 IST

ज्या कारागीरांची वार्षिक उलाढाल २० लाख रुपयांपर्यंत आहे अशा कारागीरांना जीएसटीच्या नोंदणीतून सूट देण्याचा निर्णय येथे जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

हैदराबाद : ज्या कारागीरांची वार्षिक उलाढाल २० लाख रुपयांपर्यंत आहे अशा कारागीरांना जीएसटीच्या नोंदणीतून सूट देण्याचा निर्णय येथे जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी सांगितले की, जीएसटीच्या २१ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.यात मातीच्या मूर्ती बनविणाºया कारागीरांचाही समावेश आहे. त्यांना आंतरराज्य कामासाठी नोंदणीची गरज असणार नाही. तर, सरकारी कामाच्या करारासाठी कर १८ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आला आहे. जीएसटी नेटवर्क, नोंदणीचे पोर्टल आणि टॅक्स रिटर्न यातील तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांच्या एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. जम्मू काश्मिरचे अर्थमंत्री हसीब द्रबू यांनी सांगितले की, जुलै महिन्याचे जीएसटीआर-१ रिटर्न दाखल करण्याची मुदत १० आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कारच्या उपकरातील वाढीबाबत चर्चा झाली नाही. रिटर्न दाखल करण्यात जर विलंब झाला तर १८ टक्के व्याज आकारण्याच्या निर्णयातही सूट देण्यात आली आहे, असे गोव्याचे मंत्री मौविन गोनिंहो यांनी सांगितले.डाव्या पक्षांची निदर्शनेहैदराबाद : जीएसटी परिषदेच्या बैठक सुरु असलेल्या परिसरात माकप आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निदर्शने केली. नव्या कर पद्धतीतून सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर पोलीस या कार्यकर्त्यांना एका व्हॅनमधून घेऊन गेले. भाकपचे नेते के. नारायण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.