शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतीची निवडणूक तूर्त टाळण्याचा प्रयत्न, मोदी सरकारकडे नाही पुरेसे संख्याबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:19 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक होण्याच्या शक्यतेमुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी एनडीएवर नव्याने हल्ल्याची सुरुवात केली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक होण्याच्या शक्यतेमुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी एनडीएवर नव्याने हल्ल्याची सुरुवात केली आहे. बिजू जनता दल, अण्णाद्रमुक व अन्य छोट्या पक्षांनी सरकारसोबत लोकसभेत अनुकूलता दर्शविली असतानाच विविध विधेयकावर काँग्रेस, तृणमूल व अन्य विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मोटर वाहन आणि अन्य दोन विधेयके राज्यसभेत मंजूर न होऊ शकल्याने सत्तारुढ भाजप उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा पुनर्विचार करत आहे.उपसभापतीपद २ जुलै रोजी रिक्त झाल्यानंतर त्या पदासाठी सर्वसंमतीने उमेदवार देण्याबाबत सरकार इच्छुक होते. राज्यसभेतील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चाही सुरू होती, कारण, २४४ सदस्य असलेल्या या सभागृहात सरकारकडे बहुमत नाही. यासाठी तृणमूल व बीजेडीच्या उमेदवाराबाबतही चाचपणी झाली. मात्र, या पक्षांनी त्यास स्पष्ट नकार दिला व सर्व सभागृहाला मान्य असलेल्या व्यक्तीची निवड करावी, अशी सूचना या पक्षांनी केली.या पदासाठी अनेक नावे पुढे आले. यात अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांचेही नाव होते. पण, या पदावर आपलाच नेता असावा, असे भाजपास वाटत होते. ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव या पदासाठी योग्य आहेत, असा विचार होता पण, संख्याबळाअभावी तो सोडून द्यावा लागला. त्यामुळे सत्तारुढ पक्ष पावसाळी अधिवेशनात ही निवडणूक घेण्यास उत्सुक नाही. राज्यसभेत येत्या आठवड्यासाठीच्या विषयपत्रिकेत उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नाही. कामकाजाचे केवळ ९ दिवस शिल्लक असून, भाजप नेते आता म्हणत आहेत की, अशा निवडणुकीला उशीर झाल्याचे उदाहरणे यापूर्वीही आहेत.पूर्वीही राहिले रिक्तएप्रिल २०१२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात रेहमान खान हे निवृत्त झाल्याने उपसभापतीपद रिक्त झाले होते. मात्र, निवडणूक पावसाळी अधिवेशनात घेतली. तसेच, यूपीएच्या काळात २००६ मध्ये या निवडणुकीला ४० दिवस उशीर झाला होता. २००४ मध्ये १० जून रोजी हे पद रिक्त झाले होते. मात्र, निवडणूक २ जुलै रोजी घेण्यात आली. भाजपचे सूत्र सांगतात की, पीठासीन अधिकारी अगोदरच कार्यरत असून उपसभापतीपदाशिवाय सभागृह काम करु शकते.

टॅग्स :Parliamentसंसद