शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दार्जिलिंगमधील स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा -कोलकाता हायकोर्ट

By admin | Updated: June 16, 2017 19:19 IST

दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

लोकमत ऑनलाइन
कोलकाता, दि.16- गेले चार दिवस दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. गोरखा जनमुक्ती मोर्चाने चालवलेल्या गोरखालॅंड आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील जनजीवन ठप्प झाले आहे, या पार्श्वभूमीवर काळजीवाहू प्रभारी मुख्य न्यायाधीश निशिता म्हात्रे आणि न्यायाधीश टी. चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
एका याचिकेवर सूचना देताना न्यायाधीशांनी पश्चिम बंगाल सरकारला दार्जिलिंगमधील परिस्थितीवर दोन आठवड्यांमध्ये अहवाल देण्यास सांगितले. गोरखालॅंडच्या या मागणीमुळे सरकारी  आणि खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले याचीही माहिती देण्यास न्यायालयाने यावेळेस सांगितले. याचिकाकर्ते रामप्रसाद सरकार यांनी या याचिकेत गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग, सरचिटणीस रोशन गिरी यांना प्रतिवादी केले आहे. 9 जूनपासून दार्जिलिंगमध्ये अशांतता पसरली आहे.
 
दार्जिलिंगपासून 50 किमी अंतरावरील मिरिक येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयही आंदोलकांनी पेटवून दिले. या आंदोलनामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल, शाळा, विद्यालये त्याचप्रमाणे बॅंका, एटीएम केंद्रेही बंद झाली आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असून सहा लोकांना अटकही केली आहे. आंदोलन सुरु झाल्यावर दार्जिलिंगमध्ये  राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला होता . गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत बोलताना सांगितले होते, "इथली स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे,  येथे काहीही घडू शकते. त्यामुळे पर्यटकांनी दार्जिलिंग सोडावे असे माझे  सांगणे आहे, तरिही ते येथे राहणार असतील त्यांनी स्वतःच्याच जबाबदारीवर राहावे."