शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरचं पुढचं टार्गेट भारत ?

By admin | Updated: February 13, 2017 17:15 IST

ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिका 12 देशांच्या पॅसिफिक पार्टनरशिपमधून बाहेर पडला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापार धोरणांपासून भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि व्हिएतनाम काहीसे बचावले असले तरी येत्या काळात त्या देशांवरही ट्रम्प यांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. अमेरिका या सर्व देशांशी व्यावसायिकरीत्या तोट्यात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिका 12 देशांच्या पॅसिफिक पार्टनरशिपमधून बाहेर पडला. त्यानंतर त्यांनी जपान, चीन आणि साऊथ कोरियाच्या ट्रेड पॉलिसीवर हल्लाबोल केला होता. तसेच अमेरिका कराच्या सुधारित धोरणानुसार आयातीवर कर लावू शकतो. ट्रम्प यांच्या संरक्षणात्मक धोरणांवर अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असून, ग्लोबल अर्थव्यवस्थेच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. अमेरिका व्यापाराच्या दृष्टीनं तोट्यात असलेल्या देशांबाबत धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांचे नॅशनल ट्रेड काऊन्सिलचे प्रमुख पीटर नैवारो आणि कॉमर्स सेक्रेटरी विलबर रॉस यांनी एक पेपर प्रसिद्धीस दिला होता. त्यात अमेरिका व्यावसायिकरीत्या तोट्यात असलेल्या देशांवर टीका करण्यात आली होती. आशियातील जवळपास सर्वच देश अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार  भारतासोबतच्या व्यापारात अमेरिका तोट्यात आहे. त्यामुळे ट्रम्प कधीही भारतासोबत असलेल्या व्यावसायिक धोरणांमध्ये बदल करू शकतात, अशी शक्यता एशियन ट्रेड सेंटरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डेबुरा एम्स यांनी सांगितलं आहे. (डोनाल्ड ट्रम्प काढणार प्रवेशबंदीचा नवा आदेश!)(ट्रम्पशाहीची भयकारी वाटचाल)भारत आणि अमेरिकेत डब्लूटीओच्या नियमांनुसार 2005च्या ट्रेड पॉलिसी फोरमच्या आधारावर व्यापार होतो. भारत आणि अमेरिकेचा व्यापार 2005मध्ये 29 बिलियन डॉलरहून वाढून 2015मध्ये 65 बिलियन डॉलरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारत मोठ्या प्रमाणात अमेरिकेला आयटी सर्व्हिस, टेक्सटाइल, किमती दगड निर्यात करतो. मात्र अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार तोट्यात आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन हा देश आहे. ट्रम्प चीनवर कारवाई करत नसले तरी त्या देशावर त्यांची नजर आहे. त्यापार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना इशारा दिला असून, ट्रेड पॉलिसी बदलल्यास दोन्ही देशांतील व्यापार प्रभावित होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.