शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:52 IST

केजरीवालांना वगळल्यानंतर बचावात्मक पवित्रा

नवी दिल्ली : मेलानिया ट्रम्प यांच्या शाळा भेटीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची नावे वगळल्याप्रकरणी आपने आक्रमक न होता बचावात्मक धोरण स्वीकारले आहे. याबाबत उघडपणे काहीही न बोलण्याचे निश्चित करतानाच केवळ कामकाजावर लक्ष्य केंद्रित करण्याचा पवित्रा आपने घेतला आहे.अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या दिल्लीतील सरकारी शाळांमधील हॅप्पिनेस क्लासची दखल घेऊन भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीवेळी या संकल्पनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, दोघांची नावे भेटीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उघडपणे काहीही न बोलण्याचे धोरण आम आदमी पार्टीने स्विकारले आहे.सर्वसाधारणपणे अशावेळी टीका आणि विविध प्रकारचे वक्तव्य केले जाते. मात्र, यापुढे वायफळ गप्पा, टीका, टिपण्णी आणि अन्य बाबींना महत्त्व देण्यापेक्षा कामाचेच बोलायचे, आरोप किंवा अन्य बाबी करायच्या नाहीत, असे केजरीवाल यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. आताही याप्रकरणी माध्यमांनी विचारले असता सिसोदिया आणि गोपाल राय यांनी काहीही न बोलणेच पसंत केले आहे.आपच्यावतीने केजरीवाल यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. सिसोदिया यांना मॉस्कोचे निमंत्रण होते. त्यावेळी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावर बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. जाण्याची परवानगी द्या किंवा नका देऊ पण चर्चा तर आमचीच होत असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. आताही भेटीतून नावे वगळली असली तरी चर्चा केवळ आमचीच होत असल्याचा संदेश यातून देण्यात येत आहे. सिसोदिया यांनीही एका टविटमध्ये थेट उल्लेख न करता या क्लासद्वारे कशाप्रकारे शिकवण दिली जात आहे, एवढेच म्हटले आहे. त्यामुळे आपची रणनिती बदलली असून यापुढे केवळ विकासाचेच राजकारण करण्याचे आणि परिपक्वतेचे दर्शन घडविण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प