हैदराबाद - तेलंगणामध्ये राजकीय संघर्षात तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (6 ऑक्टोबर) सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्या हत्येची माहिती मिळताच आक्रमक झालेल्या रेड्डी समर्थकांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक! तेलंगणामध्ये टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 12:27 IST