शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

TRAI Update : मोबाइल कॉलवर आययूसी चार्जेस लावण्याबाबत ट्रायचा लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 01:57 IST

TRAI Update : जिओ वगळता अन्य सर्व टेलिकॉम कंपन्यांचा रद्द करण्याचा आग्रह

नवी दिल्ली : मोबाइल कंपन्यांमध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्जेसमुळे (आययूसी) सुरू असलेल्या वादावर ट्राय (दूरसंचार नियामक प्राधिकरण) याच महिन्याच्या अखेरीस निर्णय घेणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एका नेटवर्कवरून दुसºया कंपनीच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी आकारले जाते.जिओहून वेगळ्या म्हणजेच अन्य कंपनीच्या फोनवर कॉल केल्यास त्यासाठी इंटरकनेक्ट युजेस चार्जेस द्यावे लागतील, असे मध्यंतरी जिओने जाहीर केले. त्यासाठी जिओच्या ग्राहकांना पॉप अप चार्जेस भरा, असे संदेश सतत येत आहेत. त्या बदल्यात जिओने अधिक डेटा ग्राहकांना देऊ केला. याप्रकारे आययूसी चार्जेस घेता येतात का, हा वाद कंपन्यांत सुरू आहे.खरे तर ट्रायने यावर्षीच्या जानेवारीतच आययूसी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यास मुदतवाढ द्यावी का, या मुद्द्यावर सर्व टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे मागवून घेतले होते. गेल्या आठवड्यात ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आययूसी चार्जेसबाबत लवकरच निर्णय घेण्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे....तर व्हॉइस कॉल बंद करूआययूसी चार्जेस रद्द करण्याच्या निर्णयास मुदतवाढ देऊ नये, असा जिओचा आग्रह आहे. तसे केल्यास मोफत व्हॉइस कॉलची सेवाच बंद करावी लागेल व दरवाढही करावी लागेल, असे जिओला वाटते. आययूसी बंदच केल्यास ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले. मात्र, अन्य कंपन्यांनी आययूसी चार्जेस असता कामा नयेत, अशीच भूमिका घेतली आहे.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायJioजिओIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनAirtelएअरटेल