शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

घारापुरी बेटाला समस्यांचा विळखा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या अखत्यारित असलेल्या दुर्लक्षित बेटाकडे विकासाची बोंब आहे. बेटावरील रहिवासी कायमस्वरूपी विजेअभावी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पर्यटक आणि बेटावरील तिन्ही गावातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धरण बांधले. मात्र धरणात पावसाळ्याव्यतिरिक्त पाणीच शिल्लक राहत नाही. धरण दुरुस्तीसाठी चार कोटी खर्च झाले मात्र नियोजनाअभावी हा निधी पाण्यात गेला.
राजबंदर जे˜ीच्या लेण्यांकडे जाणारा ४० वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. तर दुरुस्तीअभावी रस्त्यांचे कठडे ढासळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे साडेचार कोटी खर्चाचे काम निरुपयोगी ठरले . जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे किनारपट्टीची धूप झाली आहे.
घारापुरी बेटवासियांना लागलेले समस्यांचे ग्रहण सुटावे, अशी रहिवाशांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे आमदार खासदारांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रा. पं. सदस्य तथा उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मनोहर भोईर यांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील महिला बचत गट, आर्थिक सदृढ बनविण्यासाठी योजना राबविण्यात याव्यात आणि पर्यटकांसाठी आणि त्यावर आधारी लघुउद्योगांसाठी मरीन मेरीटाईम बोर्ड, एमएमआरडीए, जेएनपीटी, ओएनजीसी यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून बेटांच्या विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.
-----------------


चौकट
पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक
न्हावा शेवा समुद्रामार्गे येणार्‍या मोरावासियांसाठी जे˜ी बांधणे, तिन्ही गावात ड्रेनेजची व्यवस्था करणे, सागरी धूप संरक्षक कठडे बांधणे, राजबंदर येथे पर्यटकांसाठी शौचालय , व्यायाम शाळा, समाजमंदिर, बेटावरील बेरोजगारांसाठी परिसरातील विविध कंपन्या, प्रकल्पात प्राधान्य आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे.
------
१) घारापुरी बेटावर प्राचीन, अद्भुत, अप्रतिम कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश
२) दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक ांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असला, तरी उत्पन्न फारच कमी आहे.
३) त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील रहिवाशांना विशेषत: युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
----------