शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

नऊ गावांत तिरंगी; ७७ ठिकाणी दुरंगी...

By admin | Updated: July 28, 2015 00:32 IST

कऱ्हाड तालुका निवडणूक धुमशान : पाच ग्रामपंचायतींचा बिनविरोधचा झेंडा; ९५३ जागांसाठी १ हजार ९८६ उमेदवार रिंगणात

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. ९८ पैकी पाच ग्रामपंचायतींने बिनविरोधचा झेंडा फडकविल्याने आता ९३ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष ४ आॅगस्टला मतदान होत आहे. पैकी नऊ गावांत तिरंगी तर ७७ गावांत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आणखी सात ग्रामपंचायती अंशत: बिनविरोधच्या उंबरठ्यावरती आहेत.शेवाळवाडी-उंडाळे, भुयाचीवाडी, भोळेवाडी, भरेवाडी, पाचुंद या ग्रामपंचायती ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बिनविरोध केल्या आहेत. उर्वरित ९३ ग्रामपंचायतींत बनवडी, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारुगडेवाडी, शिंदेवाडी, लटकेवाडी, भैरवानाथनगर-काले या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.निवडणूक होत असलेल्या गावांपैकी पाल, हजारमाची, विंग, वहागाव, सैदापूर, गोवारे, बेलवडे हवेली, मालखेड, म्होप्रे येथे तिरंगी लढत होत आहे, तर ओंड, गोळेश्वर, वारुंजी, निगडी, खराडे, रिसवड, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारूगडेवाडी, साळशिरंबे, शिंदेवाडी-विंग, तासवडे, भैरवनाथनगर,लटकेवाडी, मालखेड, कालवडे, वाठार, बेलवडे बुद्रुक, वडगाव-उंब्रज, मरळी, पेरले, कोळे, पोतले, पार्ले, वडोली निळेश्वर, कार्वे, घोणशी, घारेवाडी, खोडशी, गोटे, म्होप्रे, घोगाव, टाळगाव, केसे, अभयचीवाडी, किरपे, काले, बेलदरे, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डी, विरवडे, करवडी, बनवडी, शिरवडे, येरवळे, चचेगाव, खुबी, कोडोली, सवादे, शेवाळेवाडी-म्हासोली, शिवडे, वराडे, भवानवाडी, अंबवडे, बामणवाडी, मुंढे, शहापूर, नवीन कवठे, उंडाळे, म्हासोली, चिखली, हजारमाची, वाघेरी, नांदलापूर, गोळेश्वर, सुर्ली, कामथी, हणबरवाडी, गायकवाडवाडी, धोंडेवाडी, नांदगाव, गमेवाडी, साजूर, गोटेवाडी, हरपळवाडी, इंदोली, चोरे, जिंती, अकाईचीवाडी, कोणेगाव, वाघेश्वर, शेणोली, येणके, पाडळी-केसे, वसंतगड, येथे दुरंगी लढत होत आहे.तालुक्यातील तारुख ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दोघेजण रिंगणात उतरले आहेत.ज्या गावांमध्ये सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामध्ये सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील राजकारणाच्या बदलत्या समीकरणांचा गावोगावच्या निवडणुकींवर प्रभाव पडलेला दिसून येत आहे. अनेक गावांत पक्षीय झेंडे, गटतट यापेक्षा भावकी, बुडका याचे राजकारण सुरू झाले आहे.तालुक्यात ‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्र्षेेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. त्यामुळे आता गुलाल कोण घेणार? याच्या पैजाही लावल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक होत असलेल्या ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)चौकाचौकांत झळकतायत फलक !ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारास आता प्रारंभ झाला आहे. गावागावांतील मुख्य चौकासह रस्त्याकडेला निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे व पॅनेल प्रमुखांचे फोटो व चिन्हाचे रंगीत फलक लावण्यात आले आहेत.कार्यकर्त्यांकडून ‘हायटेक’ प्रचारग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काहीजण नामीशक्कल लढवित आहेत. उमेदवारांचे जाहीरनामे, निवडणूक चिन्हाचे, घोषवाक्यांनी तयार केलेल्या घोषणा या व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकवर टाकत हायटेक प्रचार केला जात आहे.