शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरामध्ये पुन्हा डावी आघाडीच विजयी होेईल, भाकपचा दावा; चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:29 IST

त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत भाजपा जिंकेल, असा निष्कर्ष २ जनमत चाचण्यांनी काढला असला, तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी केला आहे.

हैदराबाद : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत भाजपा जिंकेल, असा निष्कर्ष २ जनमत चाचण्यांनी काढला असला, तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी केला आहे. त्रिपुरात डावी आघाडीच पुन्हा सत्तेवर येईल, असेही ते म्हणाले.बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या जनमत चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे निघाले होते. याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, ईशान्य भारतातील विधानसभा निवडणुकांच्या जनमत चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद वाटतात. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला ५१ टक्के मते मिळतील, असे एका जनमत चाचणीमध्ये म्हटले आहे, तर दुसºया चाचणीत डाव्या आघाडीला ४५ किंवा ४६ टक्के मते मिळतील, असे म्हटले आहे. म्हणजे परस्परांविरुद्ध लढणा-या या पक्षांना मिळणा-या मतांच्या टक्केवारीत खूपच कमी फरक शिल्लक राहातो.त्रिपुरात १८ फेब्रुवारीला मतदान झाले. एका मतदारसंघात माकपचे उमेदवार रामेंद्र देबवर्मा यांच्या निधनामुळे मतदान झाले नव्हते. ते १२ मार्च रोजी होईल. त्रिपुरामध्ये २५ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीला पराभूत करण्याच्या तयारीने भाजपा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरात जोरदार प्रचार केला होता. भाजपाने या निवडणुकीत इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुरा (आयपीएफटी) पक्षाशी युती केली. भाजपाने ५१ तर आयपीएफटीने नऊ जागा लढविल्या. काँग्रेसने ५९ जागा लढविल्या.भाजपा हारणार - सी व्होटरचा निष्कर्षसी-व्होटर जनमत चाचणीतून त्रिपुरात डावी आघाडी सत्तेवर येईल असा निष्कर्ष सी-आला आहे. त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीला २६ ते ३४ जागांवर विजय मिळेल व ४४.३ टक्के मते या आघाडीला मिळतील असेही त्यात नमुद केले आहे. भाजप व मित्र पक्षांच्या आघाडीला २४ ते ३२ जागांवर व ४२.८ टक्के मते मिळतील, तर काँग्रेसला ७.२ टक्के मते मिळून फक्त दोन जागांवर विजय मिळेल असेही चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक