शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पती तुरुंगात गेल्यास मुस्लिम महिलेला खर्चाचे पैसे कोण देणार? ओवेसींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 15:46 IST

सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचे मुस्लिम महिला विधेयक 2019 हे पहिलेच विधेयक आहे.

नवी दिल्ली : विरोधकांच्या गोंधळातच केंद्र सरकारने शुक्रवारी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवले. यावर विरोधकांनी दावा केला की असे करणे संविधानाचे उल्लंघन आहे. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या मतदानामध्ये हे विधेयक 74 विरुद्ध 186 मतांनी पास करण्यात आले. 

सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचे  मुस्लिम महिला विधेयक 2019 हे पहिलेच विधेयक आहे. सुरुवातीला कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, लैंगिक समानता आणि न्यायासाठी हा कायदा मंजूर होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमद्ये लोकसभेत हे विधेयक पास झाले होते. मात्र, राज्यसभेमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले होते. कारण राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन लोकसभेमध्ये हे विधेयक पुन्हा नव्याने आणण्यात आले आहे. 

या विधेयकाची गरज सांगताना प्रसाद यांनी देशात या प्रकरणी 543 तक्रारी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी आणल्यानंतर अशाप्रकारचे 200 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विधेयक संमत करताना विरोधकांनी जोरदार विरोध केला. आवेसींनी सांगितले की, तिहेरी तलाकवरील विधेयक मुस्लिम महिलांच्या विरोधात आहे. या प्रकरणात जर गैर मुस्लिम व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्याला एक वर्षाची शिक्षा आणि मुस्लिमावर गुन्हा झाल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा देण्यात येणार आहे. हे संविधानाच्या 14 आणि 15 व्या तरतुदीचे उल्लंघन नाहीय का, असा सवाल ओवेसींनी विचारला. 

तिहेरी तलाकवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे स्पष्ट झाले आहे की, जर कोणी तिनवेळा तलाक म्हटले तरीही त्याचे लग्न कायम राहणार आहे. तर विधेयकामध्ये असलेल्या तरतुदीनुसार त्या महिलेचा पती तुरुंगात जाणार. एवढेच नाही तर तो तीन वर्षे तुरुंगात राहणार. मग या मुस्लिम महिलेला खर्चासाठी पैसे कोण देणार? याद्वारे केवळ पुरुषांनाच शिक्षा होणार आहे. सरकार मुस्लिम महिलांच्या हिताच्या बाजुने नसून त्यांच्यावर ओझेच लादत आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सांगितले की, मी तिहेरी तलाकच्या विरोधात नसून या विधेयकाच्या आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामध्ये सामान्य आणि गुन्हेगारी कायद्याला एकत्र आणण्यात आले आहे. 

 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकlok sabhaलोकसभा