शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक प्रथा अत्यंत वाईट, अनिष्ट!

By admin | Updated: May 13, 2017 02:49 IST

मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पीडितांच्या बाजूने बेधडक युक्तिवाद केला.तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले. तीन वेळा तलाक प्रथेच्या कायदेशीरपणाला आव्हान दिलेल्या याचिकांवर न्यायालयात ११ मेपासून सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हे निरीक्षण व्यक्त झाले. माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद हे या विषयावर न्यायालयाला वैयक्तिक पातळीवर मदत करीत आहेत. खुर्शीद म्हणाले की, ‘न्यायालयीन छाननी आवश्यक आहे, असा हा विषय नाही. याशिवाय महिलांना ‘निकाहनामा’मध्ये तलाकला ‘नाही’ म्हणण्याची अट नमूद करण्याचा हक्क आहे.’ न्यायालयाने खुर्शीद यांना तीन वेळा तलाकवर बंदी असलेल्या इस्लामिक आणि गैरइस्लामिक देशांची यादी करण्यास सांगितले.पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. हे तिटकारा आणणारे आहे...-वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पीडितांपैकी एकीची बाजू मांडली. त्यांनी बेधडकपणे युक्तिवाद केला आणि समानतेच्या हक्कांसह वेगवेगळ्या घटनात्मक पार्श्वभूमीवर तीन वेळा तलाकच्या प्रथेवर हल्ला केला. तीन वेळा तलाकचा हक्क हा फक्त पतीला आहे, पत्नीला नाही व त्यामुळे घटनेचे कलम १४ (समानतेचा हक्क)चा भंग होतो, असे म्हटले.