सुरजकुंड : सर्व केंद्रीय विद्यापीठे आपल्या परिसरातील प्रमुख ठिकाणी २०७ फूट उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवणार असल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिली. जेएनयूमध्ये भारतविरोधी निदर्शनावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचा हा प्रस्ताव पुढे आला आहे, हे विशेष. कुलगुरुंच्या बैठकीत ‘एकमता’ने हा निर्णय घेण्यात आला. मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही बैठक बोलावली होती. जेएनयू केंद्रीय विद्यापीठाला हा निर्णय लागू राहील. (वृत्तसंस्था)
विद्यापीठे फडकवणार २0७ फूट उंचावर तिरंगा
By admin | Updated: February 19, 2016 03:11 IST