शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कलामांना संसदेची श्रद्धांजली दोन दिवस कामकाज स्थगित

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

नवी दिल्ली : देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.

नवी दिल्ली : देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व सदस्यांनी कलामांना श्रद्धांजली अर्पण केली. आज मी अत्यंत जड मनाने भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करते. ते देशाचे सच्चे सुपुत्र होते, असे महाजन म्हणाल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि बहुतांश सदस्य माजी राष्ट्रपतींना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी व सदस्यांनी कलामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. शिवाय संसद सदस्यांना कलामांच्या अंत्यसंस्कारात सामील होता यावे यासाठी बुधवारसाठीही (२९ जुलै) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

बॉक्स
कॅबिनेट, निवडणूक आयोगाचीही श्रद्धांजली
केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंगळवारी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या निधनाने देशाने एक प्रभावी वैज्ञानिक, सच्चा देशभक्त आणि एक महान कर्मयोगी गमावला, अशा आशयाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.
निवडणूक आयोगानेही एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयोगाने २०१० मध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला होता. कलाम यांनी यात सहभाग नोंदवला होता. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेतील व्यापक सहभागिता आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर याचा त्यांनी कायम पुरस्कार केला, असे आयोगाने मंगळवारी जारी निवेदनात म्हटले आहे.