शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असतानाही शहरात येताहेत ट्रॅव्हल्स आदेश झुगारला : वाहतूक पोलिसांकडूनही होतोय कानाडोळा

By admin | Updated: June 22, 2016 22:03 IST

जळगाव: शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी असतानाही बिनधास्तपणे ट्रॅव्हल्स शहरात येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना ट्रॅव्हल्समालकांनी धुडकावून लावली आहे.

जळगाव: शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी असतानाही बिनधास्तपणे ट्रॅव्हल्स शहरात येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना ट्रॅव्हल्समालकांनी धुडकावून लावली आहे.
आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन ते नेरी नाका चौक पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर येण्यास व जाण्यास सर्व खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना २५ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात जाहीर झाली होती.
अजिंठा चौक व आयटीआयजवळ नवा थांबा
शहरात होणारी वाहतुकीची कोंडी तसेच विद्यार्थी सुरक्षा याचा विचार करता बाहेरगावी जाणार्‍या सर्व ट्रॅव्हल्स एकाच ठिकाणी थांबाव्यात त्यासाठी विठ्ठल मंदिर संस्थानची जागा निि›त करण्यात आली. तेथून ट्रॅव्हल्स सुरुही झाल्या, मात्र हळूहळू ही संख्या कमी होत गेली. आत दररोज सकाळी शहरात बसेस येवू लागल्या आहेत तर रात्री पुणेकडे जाताना अजिंठा चौक, गुजरातकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्स महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल व आयटीआयजवळ थांबायला लागल्या आहेत.
स्टेडियम, स्टेशनरोडवर येतात बसेस्
बाहेरगावावरून आलेल्या ट्रॅव्हल्स नेरी नाका या थांब्यावर न जाता थेट शहरात येतात. स्टेडियम कॉम्प्लेक्स, दक्षता पोलीस लाईन रोड व स्टेशन रोड परिसरात या ट्रॅव्हल्स थांबतात. या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. दरम्यान, शहरात बंदी असतानाही ट्रॅव्हल्स येत असताना वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. तत्कालिन पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी कारवाईत सातत्य ठेवले होते तसे सातत्य नूतन निरीक्षक अनिल देशमुख यांनी ठेवणे अपेक्षित आहे.
आपआपल्या भूमिकेवर ठाम
दरम्यान, राजपत्र प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यावर मालक व सामान्य नागरिकांकडून हरकती मागविल्या होत्या. त्यात ५४ जणांनी लेखी हरकती नोंदविल्या होत्या. प्राप्त हरकतीवर पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष निर्णय होण्यासाठी हरकतदारांना मूळ अर्ज व ओळखपत्रासह फेब्रुवारी महिन्यात हजर राहण्याचे कळविण्यात आले होते, परंतु त्या दिवशी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारी ही शेवटची संधी त्यांना देण्यात आली होती. त्यातही उपस्थित ट्रॅव्हल्स मालक व पोलीस प्रशासन आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. न्यायालयातही वाद प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.