शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलिसाची बदली

By admin | Updated: July 2, 2017 18:13 IST

बुलंदशहरमध्ये भाजपाच्या मुजोर नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली

ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 2 - बुलंदशहरमध्ये भाजपाच्या मुजोर नेत्याला धडा शिकवणा-या महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. श्रेष्ठा ठाकूर असं त्या महिला पोलीस अधिका-याचं नाव असून, भाजपा नेत्याला त्या महिला अधिका-यांनी चांगलाच धडा शिकवला होता. या प्रकारानंतर काही आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर लागलीच श्रेष्ठा ठाकूर यांची बदली करण्यात आली. श्रेष्ठा ठाकूर यांच्यासोबत आणखी काही पोलीस उपअधीक्षकांचीही बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे.श्रेष्ठा ठाकूर या बुलंदशहरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी त्यांनी स्थानिक पंचायतीमधील भाजपाचे नेते प्रमोद लोधी यांना दंड ठोठावला होता. त्या कारणास्तव त्यांनी पोलिसांशी वाद घातला. वादाचं धक्काबुक्कीत रुपांतर झाल्यानंतर पोलिसांनी प्रमोद लोधी यांना अटक केली होती. लोधींना अटक केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी श्रेष्ठा ठाकूर आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस वाहन चालकांकडून लाच घेत असून, श्रेष्ठा ठाकूर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आकसानं कारवाई करत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते श्रेष्ठा ठाकूर यांच्या बदलीसाठी दबाव आणत होते. श्रेष्ठा ठाकूर यांची बदली झाल्यानंतर आता भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत श्रेष्ठा ठाकूर योगी आदित्यनाथ यांचे नाव वारंवार उच्चारताना दिसत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांची चौकशी करू नये, असे पत्र भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आणावे, असे श्रेष्ठा ठाकूर म्हणाल्या होत्या. श्रेष्ठा ठाकूर यांची बदली उत्तर प्रदेशच्या बहराइच या भागात करण्यात आली आहे.