शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा

By admin | Updated: August 7, 2016 22:32 IST

नाशिक : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात रविवारी (दि. ७) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हार्‍याजवळ नागनर्सोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ नागदेवतेची रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात आली.

नाशिक : श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात रविवारी (दि. ७) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हार्‍याजवळ नागनर्सोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ नागदेवतेची रांगोळी काढून नामपंचमीची विधीवत पूजा करण्यात आली.नागदेवतेची मनोभावे पूजा करताना भिंतींवर तसेच पाटावर नागाची चित्र काढण्यात आली होती. देवापुढे रांगोळीतून नाग-नागीण आणि नागकुळं काढण्यात आली. नागपंचमीला अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया, शंखपाल, पद्मक, कर्कोटक या नऊ नागांच्या पुजनाला विशेष महत्त्व असल्याने पूजा करताना भाविकांकडून प्रार्थनेतून या नवनागांचा उल्लेख करण्यात आला. यावेळी ला‘ा, दूध, खीर आणि उकडीच्या पाणोळ्यांचा नैवेद्य दाखविण्यात येऊन कहाणीचे वाचन करण्यात आले.घरोघरी नागपंचमीनिमित्त गव्हाची खीर, पुरणाचे दिंडं, उकडीचे पाणोळे अशा पदार्थांचे सेवन करण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, केस विंचरू नये, अशी अख्यायिका असल्याने याबाबतचे नियम भाविकांकडून पाळण्यात आले. शहरातील कॉलेज रोड तसेच मॉल्समध्ये जाऊन महिलांनी आपल्या हातावर मेंदी काढत श्रावण महिन्यातील पहिल्याच सणाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील अनेक भागांत वारुळांचे पूजनही महिलांकडून करण्यात आले तसेच शहरापासून जवळ असलेल्या उपनगरांमध्ये झोके खेळून तसेच वारूळ पूजन करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नागदेवतेच्या पूजनासाठी मखमलाबाद येथील नागमंदिर, पंचवटीतील नाग चौक येथील मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शेतकर्‍यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या नागदेवतेची शेतकर्‍यांनीही मनोभावे पूजा केली. आपल्या धान्याचे उंदीर, घुशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांकडून नागदेवतेचे पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)चौकट :नाशिकरोडच्या बातमीची चौकट वापरणेफोटो : तांबे देणार आहेत.