शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

विषारी कोल्डरिफ सिरप प्रकरण; औषध कंपनी केली बंद, परवानाही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:52 IST

तामिळनाडू सरकारची कारवाई; ईडीचेही छापासत्र

चेन्नई : खोकल्यावरील ‘कोल्डरिफ’ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) सोमवारी स्रेसन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीशी संबंधित ठिकाणांवर तसेच तामिळनाडू अन्न व औषध प्रशासनाच्या (टीएनएफडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. २२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोल्डरिफ या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूतील स्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचा उत्पादन परवाना राज्य सरकारने रद्द केला आहे. तसेच ही कंपनी त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत चेन्नईतील किमान सात ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये स्रेसन फार्मास्युटिकल्सच्या प्रमुख कर्मचाऱ्यांचे कार्यालय व निवासस्थान, टीएनएफडीएचे तत्कालीन प्रभारी संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्याशी संंबंधित ठिकाणाचा समावेश आहे. कार्तिकेयन यांना जुलै महिन्यात लाच प्रकरणात तामिळनाडू दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने अटक केली होती. ईडीच्या सूत्रांनी सांगितले, विषारी कोल्डरिफ सिरपच्या विक्रीमधून मिळवलेला नफा हा गुन्हेगारी पद्धतीने मिळविलेले उत्पन्न आहे. 

कंपनीविरोधात कारवाई२२ मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोल्डरिफ या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूतील स्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचा उत्पादन परवाना राज्य सरकारने रद्द केला आहे. तसेच ही कंपनी त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. ही माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. राज्य औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत, या सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल या विषारी रसायनाचे ४८.६ टक्के प्रमाण आढळले. 

तपास यंत्रणांकडून ठोस पुरावे गोळा करणे सुरू याबाबत या तपास यंत्रणेकडून ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशात नोंदविलेला पोलिस एफआयआर आणि तामिळनाडूतील लाच प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आधारे ईडीने ही छापे घालण्याची कारवाई केली. कोल्डरिफ सिरप घेतल्याने प्रदेशात २२ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Toxic Cold Relief Syrup Case: Company Closed, License Revoked

Web Summary : Following deaths linked to Cold Relief syrup, authorities raided Sresan Pharmaceuticals and officials. The company's license was revoked after a toxic chemical was found in the syrup. The ED suspects money laundering and is gathering evidence related to the case, where 22 children died.
टॅग्स :medicinesऔषधं